बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

नवी दिल्ली | भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच आता चीनच्या आर्थिक पेचप्रसंगाच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वधारले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारताही दिसून येत आहे.

भारतीय दिल्ली सराफ बाजारात गुरूवारी सोन्याच्या किंमतीत 455 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर  46,532 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एचडीएफ सिक्युरिटीच्यानुसार रूपयाची घसरण हे त्याच्या मागचे कारण आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये 99.9 टक्के ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रूपयांच्या जवळ पोहचली आहे.  24 कॅरेट सोन्याची किेंमत 46, 987 रूपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली.

चांदीच्या किंमतीत सुद्धा आज जबरदस्त घसरणीचा कल दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारही आज सोन्याचा दर 1,795 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी चांदीचे भाव 894 रूपयांनी वाढून ते 61,926 रूपये प्रति किलोवर बंद झाले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किंमतीत कोणतेही विशेष बदल झाले नाहीत आणि ते 23.20 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. डॉलरची किंमत कमी होणे आणि युएस बॉण्डच्या उत्पन्नातत घट झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत व्यापार झाला. कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या स्पॉट प्राईसमध्ये 0.12 टक्के वाढ झाली आहे. असं एचजीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“ऐट राजाची आणि वागणूक भिकाऱ्याची, अशी ठाकरे सरकारची अवस्था”

‘…तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणार’; अमित शहांचा पाकिस्तानला इशारा

वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत वरूण गांधींचा मोदी सरकारवर निशाणा; पाहा व्हिडीओ

“मी रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन, हवं तर गडगडत जाईन, कोणाला काय प्राॅब्लेम?”

‘बास झालं राजकारण, हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं…’; उदयनराजेंचं खुलं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More