बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा आजचे दर एका क्लिकवर, आजही दरात घसरण

मुंबई |  सणासुदीच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होतांना दिसत आहे.  त्याचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

गौरी- गणपतीच्या सणामुळे सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय सराफ बाजारात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढलेले दिसत आहे. त्यामुळे भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45 हजार  रूपयांपेक्षा जास्त झाली आहे.

चांदी सराफ बाजारात प्रति किलोसाठी 61541 रूपये मोजावे लागणार आहेत. गुरूवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 491 रूपये प्रति 10 ग्रॅमसाठी मोठी घसरण झाली. त्याचबरोबर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर एकुणच सोन्याचे दर आज 45,735 रूपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा किंमतीत कोणताही मोठा बदल झाला नाही.

दरम्यान,  देशात काही वर्षापासून सोन्याच्या दरात तब्बल 10 हजार रूपयांनी घट झालेली दिसत आहे.  ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रूपये प्रतितोळा इतक्या दरावर गेले होते. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीत मोठा बदल होत असताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी होत राहिल्या तर येत्या काळात सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरात देखील मोठी घसरण होताना दिसतेय.

थोडक्यात बातम्या- 

लोकसभा निवडणुकीआधी मोदी-गडकरींचा मेगा प्लॅन, तब्बल ‘इतके’ प्रकल्प हाती घेणार!

जागतिक बँकेचा तालिबानला दणका! बँकेच्या ‘त्या’ निर्णयामुळे तालिबान्यांचं झालंय अवघड

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवरराज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

“शिवसेनेला वाचवायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या बाहेर पडायला हवं”

मुंबईचा जगभरात डंका! प्रामाणिकपणाच्या सर्वेक्षणात पटकावला दुसरा क्रमांक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More