बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

मुंबई |  सणासुदीच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होतांना दिसत आहे.  त्याचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळत आहे. त्याबरोबर चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

गौरी- गणपतीच्या सणामुळे सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय सराफ बाजारात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढलेले दिसत आहे. त्यामुळे भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजार रूपयांपेक्षा जास्त झाली आहे.

चांदी सराफ बाजारात प्रति किलोसाठी 61507 रूपये मोजावे लागणार आहेत. गुरूवारी दिल्ली सरफा बाजारात सोन्याच्या किमतीती 438 रूपये प्रति 10 ग्रॅमने मोठी वाढ झाली. त्याचबरोबर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर एकुणच सोन्याचे दर आज 47,255 रूपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा किंमतीत कोणताही मोठा बदल झाला नाही.

दरम्यान,  देशात काही वर्षापासून सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार रूपयांनी घट झालेली दिसत आहे.  ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रूपये प्रती तोळा इतक्या दरावर गेलं होतं. त्यामुळे सध्याच्या आकडे वारीत मोठा बदल होत असताना दिसून येत आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी होत राहिल्या तर येत्या काळात सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरात देखील मोठी घसरण होताना दिसतेय.

थोडक्यात बातम्या- 

“उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होईल”

तालिबान्यांमध्येच तांडव! नव्या सरकारमध्ये फूट, उपपंतप्रधानांनी काबूल सोडलं

“…तर मग आपले पोलीस सरकारने 100 कोटी मोजायला बसवलेत का?”

…तर विराट कोहली ट्रिपल सेंच्युरी मारणार; कपिल देव यांचं मोठं वक्तव्य

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या किरीट सोमय्यांवरच गंभीर आरोप

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More