बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं” – तृप्ती देसाई

मुंबई | परमबीर सिंह यांच्या ‘लेटरबॉम्ब’ नंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकारवर या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर लोकसभेतही महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा आणि चित्रा वाघ यांच्यावर टीका करणारी फेसबूक पोस्ट लिहिली. या वादामध्ये आता तृप्ती देसाई यांनी उडी घेतली असून त्यांनीही रूपाली चाकणकर यांना खडे बोल सुनावले आहेत तसेच चित्रा वाघ आणि नवनीत राणा यांच्यावर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं आणि माझ्या प्रश्नांची तातडीने उत्तर द्यावी असं म्हटलं आहे.

तृप्ती देसाई यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून पुण्यात आंदोलन कधी करणार आहात? पंधरा दिवस हे प्रकरण राज्यभर गाजत असताना पुण्यात राहूनही चकार शब्द तुम्ही काढला नाही याबाबत स्पष्टीकरण कधी देणार आहात? करुणा शर्मा मुंडे यांनी मुंबई पोलिसांना तक्रार दिली त्या बाबतीत काय ऍक्शन घेणार? अशा प्रकारचे नानाविध प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केले आहेत.

यामध्येच, तृप्ती देसाईंनी पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्र दोन अपत्त्यांचा उल्लेखच केला नाही, म्हणून त्यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करा याबाबत आवाज उठवणार आहात का? त्याबरोबरच, गोरगरिबांचा मिटर विज बिल न भरल्यामुळे तुम्ही काढून त्यांच्या घरी अंधार केलाय या राज्य सरकारच्या हुकूमशाही विरोधात तुम्ही गरिबांच्या बाजूने कधी उभे राहणार आहात?

तृप्ती देसाई यांनी हे सगळे प्रश्न उपस्थित केल्यानंतर शेवटी त्यांनी म्हटलं आहे की, मी काय राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्ती नाही, नवनीत राणा आणि चित्रा वाघ यांची बाजू मी घेत नाही, पण महिला नेत्या म्हणून काम करत असताना फक्त राजकारण म्हणून टीका करू नका. न्याय सगळीकडे सन्मान द्यायला शिका अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिका, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण

“आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी पण त्यात सहभागी होईल” – नितीन राऊत

‘एटीएसने जप्त केलेली ‘ती’ व्हाेल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधील व्यक्तीची’; राष्ट्रवादीचा आरोप

“उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची, करावे तसे भरावे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More