बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांच्या मराठवाडा दौऱ्याआधी पंकजा मुंडे यांची अचानक तब्येत बिघडली!

मुंबई | माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चार दिवस कोणालाही भेटू शकणार नाहीत. याबाबत पंकजा मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. पंकजा मुंडेंच्या घशाला त्रास होत असल्यामुळे त्या कार्यकर्त्यांशी चार-पाच दिवस संवाद साधणार नाहीत.

टॉन्सिल्स तसेच घशात फोड आल्यामुळे पंकजा मुंडे यांना डॉक्टरांनी चार-पाच दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पंकजा मुंडे कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत.

येत्या चार दिवसांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळीच पंकजा मुंडे आजारी पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. पंकजा मुंडे लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी समर्थक प्रार्थनेचे संदेश सोशल माध्यमांवर लिहित आहेत.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांची केंद्रीयमंत्री पदी वर्णी न लागल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असल्याने पंकजांना फडणवीसांची भेट घ्यायची नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना टाळल का?, असा सवाल उपस्थित केला जोत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

”काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं होईल”

‘…तर ड्रोन हल्ले करण्याचा अधिकार अमेरिकेकडे आहे’; अमेरिकेचा पाकिस्तानला धमकीवजा इशारा!

‘…तशीच जनजागृती राजकीय नेत्यांमध्ये व्हायला हवी’; उद्धव ठाकरेंचा सर्वपक्षीय नेत्यांना टोला!

“आमचं 2024 ला सरकार येणार, आम्ही शेतकऱ्यांना नक्की मदत करू”

याला म्हणतात ऑफर! अवघ्या 25 हजारात होंडा अॅक्टिव्हा आणा घरी, जर आवडली नाही तर….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More