बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नात स्टेजवर जाण्याआधीच नवरीनं केला हवेत गोळीबार, पाहा व्हायरल व्हिडीओ

लखनऊ | कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडत आहे. या लाॅकडाऊन काळात अनेक लग्न पार पडलेली पहायला मिळाली. तसेच लग्नाचे अनेक भन्नाट किस्सेही पहायला मिळाले. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आणखी एक लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरीनं लग्न मंडपात हवेत गोळीबार करत तिची हौस पूर्ण केली आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या प्रतापगड येथील असून सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

नवरीनं लग्नासाठी स्टेजवर चढत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं तिच्या हातात रिवॉल्वर दिली. यानंतर नवरीनं स्टेजवर चढताच पहिल्यांदा हवेत गोळीबार केला आणि यानंतर तिनं नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घातली. नवरीनं हवेत गोळीबार करताच उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.

दरम्यान, हा व्हिडीओ काहीच क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होताच एसओ जेठवारा संजय पांडे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, हे खरंच झालं असल्यास याप्रकरणी लायसन्स जप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या – 

रुसून गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केलं धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्याचा किटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न

सुरा घेऊन चोरी करायला आलेल्या 2 चोरांवर भारी पडली एकटी महिला डाॅक्टर

ह्रदयद्रावक! कोरोनानं मृत्यू झालेल्या वडिलांच्या मृतदेहास हात लावण्यासही मुलांचा नकार

आठवड्यापूर्वीच कोरोनावर मात केलेले ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचं दुःखद निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More