बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रणबीरच्या आधी ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं आलियाचं नाव

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आज विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरच्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.

चॉकलेट बॉय रणबीरचं यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. फक्त रणबीरच नाही तर आलियाच्या अफेअर्सच्या चर्चाही सोशल मीडियावर खूप रंगल्या होत्या. रणबीरपूर्वी आलियाचं नावही अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं.

बॉलिबूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यापूर्वी आलिया तिचा जूना मित्र अली दादरकरला डेट करत होती. त्यानंतर आलिया ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातील तिचा सहअभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, ते काही काळानंतर वेगळे झाले. त्यानंतर हाईक मेसेंजरचे संस्थापक केविन मित्तलसोबतही आलियाचं नाव जोडलं गेलं होतं. आलिया व केविन अजूनही चांगले मित्र आहेत.

दरम्यान, आलिया आणि वरूण धवनचं नावही अनेकदा जोडलं गेलं मात्र या दोघांनीही या वृत्ताचं खंडण केलं. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया व रणबीरची जवळीक वाढली. त्यानंतर दोघांनीही अनेक ठिकाणी एकत्र हजेरी लावत त्यांच्या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब केलं. बॉलिवूडची ही लाडकी जोडी आज लग्नगाठ बांधणार असून त्यांची एक झलक बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

थोडक्यात बातम्या-

रेल्वेचा प्रवाशांना दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘मंजुलिका’ पुन्हा परतली….; ‘भूल भुलैंया 2’ चा धमाकेदार टीझर रिलीज

चक्क 1 रूपयांत मिळणार 1 लीटर पेट्रोल, जाणून घ्या कुठे मिळतीये ऑफर

अखेर NCB ला नवीन झोनल डायरेक्टर मिळाले; वानखेडेंच्या जागी ‘या’ अधिकाऱ्याची वर्णी

सुजात आंबेडकर राजकारणात येणार?, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More