बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Raj Thackeray| पुणे दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून भूमिका घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राज्यात मशिदींवरील भोंग्यावरून वाद सुरू असताना हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात (Pune) महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाआरतीसोबत हनुमान चालिसाचं सामुहिक पठन देखील केलं जाणार आहे. 16 एप्रिल रोजी पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारूती मंदिरात संध्याकाळी 6 वाजता आरती होणार आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे राजकारणात काय खळबळ उडणार हे बघावं लागेल.

राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत बोलताना कार्यकर्त्यांना मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत हे भोंगे उतरवण्यासाठीची 3 मे पर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे राज्यात मनसे (MNS) विरूद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वाद पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या वादाचे पडसाद राज्यभर उमटत असताना पुण्यातील सर्व हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या तयारीला वेग आला आहे. खालकर चौक हनुमान मंदिरात सामुहिक हनुमान चालिसा पठण होणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

युक्रेनसाठी ‘या’ देशांनी घेतला मोठा निर्णय, उचललं महत्त्वाचं पाऊल

आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं, म्हणाले…

“संजय राऊतांनी माफी मागावी अन्यथा…”; भाजपचा राऊतांना थेट इशारा

CISF जवानांनी वाचवले तरूणीचे प्राण, झालं असं की…; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More