बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

T-20 विश्वचषकापुर्वीची ‘ती’ एक चूक अन् पाकिस्तानला मागावी लागली बीसीसीआयची माफी

मुंबई | आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेला युएई आणि ओमानमध्ये सुरूवात झाली आहे. यावर्षी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारत करत आहे. परंतु कोरोना महामारीमुळे ते सामने यु्एई आणि ओमानमध्ये होत आहेत. विश्वचषक सामने होण्याच्या आधी पाकिस्तानी संघाने एक मोठी चूक केली आहे. यावर बीसीसीआयने ताशेरे ओढल्यानंतर पाकिस्तानने ती चूक दुरूस्त करत बीसीसीआयची जाहीर माफी मागितली आहे.

टी-20 विश्वचषक 2021 च्या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाने आपल्या जर्सीवर भारताचं नाव टाकणं बंधनकारक आहे. परंतु पाकिस्तान संघाने जाणिवपूर्वक आपल्या जर्सीवर ओमानचं नाव टाकलं. बीसीसीआयने याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या जर्सीवर पाकिस्तान संघाने भारताचं नाव टाकलं. त्यानंतर पाक क्रिकेट मंडळाने या प्रकरणी दिलगिरी देखील व्यक्त केली.

विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान संघ एकाच गटात खेळणार आहे. भारतातील तसेच जगभरातील क्रिकेटप्रेमींना सर्वात जास्त ज्या सामन्याची आतुरता लागून असते. तो भारत-पाक सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे चाहते हा सामना बघण्यासाठी वाट पाहत आहे.

दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा, के.एल. राहुल, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, यासारख्या धाकड खेळांडूचा भरणा भारतीय संघात आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ कशा पद्धतीची कामगिरी करणार आहे, ते आता पाहावं लागणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार, कांचन गिरीजींनी घेतली भेट

आमच्या धर्माचा अपमान होत आहे म्हणत तरूणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा… पाहा व्हिडीओ

“चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल”

…अन् क्षणात भलं मोठं घर कोसळलं, पाहा केरळमधील थरारक व्हिडीओ

भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन मोठ्या नेत्यांचा पक्षाला रामराम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More