बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीनं सांगितला गेम प्लॅन, म्हणाला…

मुंबई | कसोटी क्रिकेटचा विश्वचषक समजला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना अवघ्या काही तासाभरात रंगणार आहे. सर्व क्रिकेच जगताचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. इंग्लंडच्या साऊथेम्पटनमध्ये हा सामना होणार असून भारताने आपल्या 11 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. भारताचा संघ जाहीर करण्यात आल्यावर कर्णधार विराट कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनसलाठी भारतीय संघाचा नेमका गेम प्लॅन काय असेल, याबाबत कोहलीने मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतीय संघ हा आक्रमकतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे या सामन्यातही आम्ही आक्रमक खेळ करणार आहोत. दोन्ही संघ चांगलेच समतोल आहेत आणि चांगला सामना होईल अशी आशा आहे. पण आम्ही जेव्हा मैदानात उतरू तेव्हा आम्ही आक्रमकच असणार आहोत. आमच्यासाठी हा एक कसोटी सामना आहे, जो जिंकण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत, असं विराट कोहली म्हणाला.

इंग्लंडमध्ये वातावरण सारखं बदलत असतं. पण यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही जर या सामन्यात पराभूत झालो किंवा विजयी ठरलो तर क्रिकेट थांबणारं नाही. हा सामना सर्वोत्तम संघ कोणता आहे, यासाठी आहे. आतापर्यंत आम्ही गेल्या 4-5 वर्षांमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे, त्याचबरोबर बरेच विजय मिळवले आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असंही विराटने सांगितलं आहे.

भारतीय संघ- विराट कोहली कर्णधार , रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे. 2019 च्या विश्वचषकमध्ये सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना तयार झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

सारथी संस्थेला निधीची कुठलिही कमतरता पडू देणार नाही- अजित पवार

राज्याला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका; आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

भाजपला लागणार मोठी गळती, अनेक बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर….’; सौरव गांगुलीने दिला खास सल्ला

‘सर्वगुण संपन्न असला तरी…’ खंत व्यक्त करत शिल्पा शेट्टीने केला राज कुंद्राचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More