बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आधी सचिनने भारतीय संघाला दिल्या ‘या’ खास टिप्स

नवी दिल्ली | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान भारत आणि न्युझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार असल्यानं संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. भारतीय संघ या सामन्यासाठी पुर्णपणे तयार आहे. तर विरोधी संघ देखील त्याच जोशात सामन्यात उतरेल. या सामन्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने भारतीय संघाचा महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

इंग्लंडमधील टेस्टमध्ये वातावरणाची भूमिका मोठी असते. मैदानात गवत आणि आकाशात ढग असतील तर सुरुवातीला काळजीपूर्वक खेळणं आवश्यक आहे. एकदा सेट झाल्यानंतर वेगाने रन निघू शकतात. साऊथम्पटनच्या पिचवरही ही परिस्थिती निर्णायक ठरेल. मैदानातील बाऊन्स हा फक्त टीम इंडियासाठी नाही, तर इंग्लंडसाठी देखील अडचणीचा असेल, असं सचिन म्हणाला.

मोहम्मद शमी वेगाने बॉलिंग करतो. बुमराहची शैली एकदम वेगळी आहे. इशांतची उंची चांगली आहे. उमेश आणि सिराज देखील आहेत. हे सर्व जण एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. एक पॅकेज म्हणून हे सर्व प्रभावी बॉलर्स आहेत. त्यांचा योग्य वेळी वापर केला तर भारताला त्याचा फायदा होईल, असा सल्ला त्यानं दिला आहे.

आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना एकत्र खेळल्याचा फायदा आहे. हे दोघे बॅटींग देखील करु शकतात. ते त्यांनी यापूर्वी अनेकदा दाखवून दिलं आहे. लोअर ऑर्डरमध्ये ते दोघं चांगली खेळी करतात. मोठी पार्टरनरशिप करण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे या दोघांनाही खेळवणे हा चांगला पर्याय असू शकतो, असं सचिनने सांगितलं आहे. तर न्युझीलंडचं पारडं किंचित जड असल्याचं त्यानं आधी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलाय पुरूषार्थ?- चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार- किरीट सोमम्या

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

“…तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल”

…तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल- प्रकाश आंबेडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More