जळगाव | राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं राजकीय वातावरण चांगलंच पेटवलं आहे. अद्यापही काही ठिकाणी आंदोलन चालू असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पुकारलेल्या एसटी संपाचा तिढा काही संपायचं नाव घेईना.
शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. मात्र सरकारकडून त्यांची विलीनीकरणाची मागणी मान्य होत नसल्यानं अनेकांनी धक्कादायक पावलं उचलली तर काहींनी आंदोलन पुकारलं.
सध्या जळगावमध्ये एसटी कर्माचारी आणि त्यांच्या कुटुंबाचं ‘भीक मांगो’ आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जळगावमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आंदोलन पुकारण्यात आलं आहे. एसटीच्या विभागीय कार्यालयापासून एसटी स्टँडपर्यंत भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
दरम्यान, या आंदोलनात भीक मागून जमा झालेली रक्कम ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत. त्यामुळे आता सरकार यावर काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या –
Republic Day 2022: शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बाहेर, ध्वजारोहन सोहळ्याला लावली हजेरी
Republic Day 2022: जीवघेण्या थंडीतही जवानांनी ‘इतक्या’ फूट उंचीवर फडकवला झेंडा
येत्या 2 ते 3 दिवसांत ‘या’ भागात कडाक्याची थंडी, हवामान विभागाचा इशारा
अमोल कोल्हेंविरोधात 26 जानेवारीला नारायणगावातील घराबाहेर सविनय आंदोलन
‘देशाचं पहिलं राष्ट्रगीत’ म्हणत कंगनाने शेअर केला व्हिडीओ अन् वादाला तोंड फुटलं
Comments are closed.