बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींचा आणखी एक मोठा निर्णय, ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात!

नवी दिल्ली | गेल्या 4 वर्षापासून म्हणजेच कोरोना काळाच्या आधीपासून देशाची अर्थव्यवस्था डबगाईला आली होती. त्यात आणखी भर म्हणून कोरोना काळात देशातील उद्योगधंद्यांचं कंबरडं मोडलं. त्यामुळे गेल्या 4 वर्षात अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले दिसत आहेत. सरकारला खर्च करण्यासाठी आता पैसे कमी पडू लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आता सरकारी संपत्ती विकू पाहत आहे. त्यातच आता सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात देखील झाली आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे आयडीबीआय बँकेतील निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने कायदेशीर आणि व्यावहारिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. आता केंद्राने आयडीबीआय निर्गुंतवणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

आयडीबीआय या सरकारी बँकेत केंद्र सरकार आणि LIC या दोघांची 94 टक्के हिस्सेदारी आहे. यामध्ये केंद्राचा वाटा 45.48 आहे. ही हिस्सेदारी विकून सरकार पैसे उभा करताना दिसत आहे.  2019 मध्ये केंद्र सरकारने आपला बहुतांश हिस्सा एलआयसीला विकला होता. त्यामुळे IDBI च्या कारभाराची सूत्रे एलआयसीच्या हातात आली होती. सध्या आयडीबीआय बँक चांगल्या स्थितीत असली तरी, केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेशी चर्चा करुन यासंदर्भात अंतिम निर्णय घेईल, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, 2014 नंतर मोदी सरकारच्या काळात सरकारी संपत्ती मोठ्या प्रमाणात विकली जात असल्यानं आता तज्ज्ञांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वचजण मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेे. तर आणखी दोन बँका येत्या काळात विकल्या जाणार आहेत, असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

…हा तर ओबीसींवर घोर अन्याय; आम्ही याविरूध्द न्यायालयात धाव घेणार- पंकजा मुंडे

ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी आम्ही…- देवेंद्र फडणवीस

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का; 39 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?

“कणी कोणाचं ऐकायचं नाही, हा एकच सरकारमधील किमान समान कार्यक्रम”

“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More