बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टी-20 विश्वचषकामध्ये ‘या’ गोलंदाजानी केला जागतिक विक्रम! ब्रेट ली, मलिंगालाही टाकले मागे, पाहा व्हिडीओ

मुंबई | आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेला धमाकेदार सुरूवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात ओमान संघाने पापुआ न्यु गिनी संघावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर स्कॉटलॅंड संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड या तगड्या संघाला हरवणाऱ्या बांग्लादेश संघावर धक्कादायक विजय मिळवला. क्रिकेट प्रेमींसाठी ही रविवारची मेजवाणी आजही बघायला मिळाली आहे. आयर्लंड विरूद्ध नेदरलॅंड सामन्यात आयरीश गोलंदाज कर्टीस कॅम्फेर याने विश्वचषक स्पर्धेमध्ये जागतिक विक्रम  केला आहे.

नाणेफेक जिंकून नेदरलॅंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलॅंड संघाचा सलामीवीर फलंदाज मॅक्स ओडोडने अर्धशतकी खेळी केल्यामुळे 106 धावांचं लक्ष्य ठेवता आलं. त्याआधी आर्यलॅंड संघाचा गोलंदाज कर्टीस कॅम्फेर धारधार गोलंदाजी करत एका षटकामध्ये 4 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला आणि विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला. या सामन्यात नेदरलॅंडच्या 6 फलंदाजाला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे नेदरलॅंडचा संघ अवघ्या 105 धावांवर बाद झाला.

कर्टीस कॅम्फेर आर्यलॅंड संघाकडून 10 षटक टाकण्यासाठी आला. 10 षटकामधील दुसऱ्याच चेंडूवर सर्कलमध्ये उभा असलेला रॉककडे कॉलिन अॅकर्मनचा  झेलबाद केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रियान टेनला तिसऱ्या चेंडूवर पायचीत करत त्याला शुन्य धावावर माघारी धाडलं. चौथ्या चेंडूवर स्टॉट एडवर्ड्सला बाद करत विश्वचषक स्पर्धेमधील पहिली हॅट्रीक कर्टीसने आपल्या नावावर नोंदवली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोएलॉफ व्हॅन डेरला बाद केला. अशा सलगपणे एका षटकामध्ये चार बळी घेत कर्टिसने इतिहास घडवला आहे.

दरम्यान, 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट-लीने बांग्लादेशविरूद्ध हॅट्रिक घेण्याचा विक्रम नोंदवला होता. टी -20 क्रिकेटमध्ये लसिथ मलिंगा आणि राशिद खान या खेळाडूंनी देखील हा पराक्रम केला आहे.  मात्र  टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 4 चेंडूत 4 विकेट घेणारा जगातला पहिलाच कर्टीस गोलंदाज ठरला आहे.

 

पाहा ट्विट

 

थोडक्यात बातम्या-

लवकरच साखरपुडा करेल…; कतरिना सोबतच्या साखरपुड्यावर विकी कौशलने सोडलं मौन

कौतुकास्पद! संकटाला आनंदाने सामोरं जाणाऱ्या पुण्याच्या आजीला नेटकऱ्यांनी केला सलाम

“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे”

ग्राहकांची प्रतिक्षा संपली! टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त SUV आली बाजारात

कोरोना लस टोचायला आलात तर खबरदार, अंगावर साप सोडण्याची दिली धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More