बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी संप मागे! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची मोठी घोषणा

मुंबई | एसटी कर्माचारी (S.T Worker) संपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Worker) संपानं वातावरण चांगलंच तापवलं होतं. यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळाली. अशातच एसटी संपाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

एसटी कर्मचारी संघटनेने 21 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य सरकारला सर्वात आधी संपाची नोटीस दिली होती. त्या संघटनेचे नेते अजय गुजर (Ajay Gujar) यांनी संपातून माघार घेत असल्याची मोठी घोषणा केली आहे. काल परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेतली होती या परिषदेतून ही मोठी घोषणा करण्यात आली.

‘एसटी संघटनेचे नेते अजय गुजर यांनी यावेळी विलिनीकरणासंदर्भात न्यायालय जो निर्णय देईल तो सरकार आणि कर्मचारी आम्हा दोघाना मान्य असेल’, असं म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी पुढे म्हटलं की, आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये आर्थिक मदत मिळावी. एका कुटुंबातील आतापर्यंत 10 जणांना ही मदत देण्यात आलीय. उर्वरीत कामगारांच्या कुुटुंबांना लवकरच नीधी देण्यात येणार आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी 22 डिसेंबरपासून रात्री 12 वाजेपासून कामावर रुजू व्हावे. एसटी संपाची नोटीस आम्ही दिली होती. त्यामुळे आमची संघटना संप मागे घेत आहे, अशी घोषणाही अजय गुजर यांनी केली.

थोडक्यात बातम्या – 

‘…कदाचित खूप उशीर झाला आहे’; Omicron बाबत धक्कादायक माहिती आली समोर

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

जिवा शिवाची बैल जोड़! रावसाहेब दानवेंचा पत्नी आणि नातीसह बैलगाडीतून फेरफटका

‘हा’ बहुप्रतिक्षित IPO शेअर बाजारात धडकणार; गुंणतवणूकदांरांंना मोठी संधी

इकडं सुनेची ईडीकडून चौकशी तर संसदेत सासू भाजपवर कडाडल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More