पुणे महाराष्ट्र

अखेर पुणतांब्यांतील बळीराजाच्या पोरींचं अन्नत्याग आंदोलन मागे

अहमदनगर | कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पुणतांबे गावात अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या बळीराजाच्या पोरींनी अखेर आज आंदोलन मागे घेतले. 

आंदोलक मुलींच्या मागण्यांची सरकारनं दखल घेतली असून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरवठा करू, असं आश्वासन कृषिराज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

गेल्या पाच दिवसांपासून पुणतांब्यात हे आंदोलन सुरू होते. आंदोलन करणाऱ्या मुलींची प्रकृती बिघडल्यानं शुक्रवारी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. 

दरम्यान, शेतकऱ्यांची लढाई अजून संपलेली नाही. तूर्तास उपोषण मागे घेण्यात आलं असलं तरी मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा तीव्र आंदोलन करू असं उपोषणकर्त्या निकिता जाधव हिनं सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या-

-“सर्जिकल स्ट्राईक करुन आम्ही पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली”

-महाराष्ट्रातून यावेळी ’45 खासदार’ निवडून द्या, राज्यातल्या जनतेला अमित शहांची साद

महाराष्ट्रात भाजप पूर्ण ताकदीने 48 जागांवर लढणार- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या पुणे येथील घणाघाती भाषणातील ‘महत्वाचे मुद्दे’ वाचा एकाच ठिकाणी

-बारामतीत यंदा कमळच फुलणार, देवेंद्र फडणवीसांनी केली सिंहगर्जना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या