नवी दिल्ली | गेल्या दीड वर्षात भारत आणि चीन सीमेवरील पँगाँग लेक भागात तणावपूर्ण वातावरण होते. या तणावानतंर दोन्ही देशांच्या सैन्य तुकड्या एकमेकांसमोर खड्या होत्या. भारत आणि चीन वाद चर्चेने सोडवला जावा यासाठी उभय देशांमध्ये सर्व स्तरावर चर्चा झाल्या होत्या.
पँगाँग लेक भागाजवळील भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्य तुकड्या मागे घेण्याबाबत करार झाला असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत दिली. याआधी बुधवारी चीनने करारासंबंधी घोषणा केली होती.
भारताची एक इंचही जमीन कोणत्याही देशाला घेऊ देणार नाही, असे आश्वासन संरक्षणमंत्र्यानी संसदेत दिले. “चीनशी बोलणी करताना भारताने आपले मुद्दे आक्रमकपणे मांडले आहेत. आणखी काही उर्वरीत मुद्यांवर चीनसोबत सर्व स्तरावर चर्चा चालू आहे ते आपापसातील चर्चाने आणि सहकार्याने प्रश्न सोडवले जातील. ” आतापर्यत झालेल्या बैठकीत भारताने काहीही गमावले नाही. तर चीन उर्वरीत मुद्यांवर गांभीर्याने विचार करेल अशी आशा राजनाथ सिंह यांनी संसदेत बोलून दाखवली.
चर्चेदरम्यान भारताने 3 मुद्दे ठळकपणे मांडले. ‘एलएसीचा दोन्ही देशांनी आदर करावा’ , ‘जैसे थे स्थितीत एका बाजुने बदल करू’, ‘सर्व समझोत्याचे भारत आणि चीन या दोन्ही देशांनी पालन करावे.’ या चर्चेमुळे भारत आणि चीन यांच्यामधील तणाव कमी होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
ठाकरे सरकार-राज्यपालांमध्ये वादाची ठिणगी?; कारण ठरलं विमान
…तर ते लोक देशविरोधी; सचिनला ट्रोल करणाऱ्यांविरोधात नवनीत राणा भडकल्या!
धक्कादायक! चार दिवस दारु पाजून महिलेवर सामूहिक बलात्कार
अबब… तब्बल 55 वर्षांपासून ‘या’ गावात एकाच घरातील माणूस होतोय सरपंच
अनुदान कमी होतंय, पेट्रोलप्रमाणे गॅससाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार!