बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पडद्यामागून कोणीतरी मुंडे, महाजन ही नावे देशाच्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करतोय”

मुंबई | राज्यसभेच्या निवडणुक होत असताना राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं आहे. सर्वंच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. मात्र, अनेक दिग्गजांना उमेदवारी नाकारल्याने नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला देऊ नये हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. मग कोणीही असेल खडसेंना द्यायचं की डावलायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, मुंडे आणि महाजन यांचा शिवसेना भाजप युतीच्या काळात निकटचा संबंध आला होता. या दोन नेत्यांमुळे युतीला बळ मिळाले होते, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. त्यांच्या कुटूंबियांच्या बातम्या अधिक व्यथित करणाऱ्या आहेत. पंकजा मुंडे या त्यांच्या वडिलांप्रमाणे  ओबीसींच्या नेत्या आहेत. बहुजन समाजाच्या नेत्या आहेत. पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ज्या प्रकारचे पडसाद विविध क्षेत्रात उमटले ते पाहिल्यावर वाटतं की, कोणी तरी पडद्यामागून मुंडे, महाजन यांची नावे देशाच्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, फक्त मुंडे कुटूंबाचा विषय होता म्हणून बोललो. आजही मुंडे नावाचा प्रभाव आणि पगडा महाराष्ट्राच्या   राजकारणावर आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. काही नेत्यांकडून पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होत आहे, अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू  होत्या. त्यावरून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना माझा पाठिंबा आहे. पंकजा मुंडे कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाने टेन्शन वाढलं; गेल्या 24 तासातील रूग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर

‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळ-वाऱ्यासह जोराचा पाऊस; हवामान खात्याचा मोठा अंदाज

“राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मुख्यमंत्रीपद सांभाळणं सोपं नाही”

‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’; विनायक मेटे संतापले

“भाजपने आपल्या बेलगाम प्रवक्त्यांच्या डोक्यात अक्कल घालावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More