‘मुस्लिम असणं…’, शिझानच्या आईची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं(Tunisha Sharma) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्ये प्रकरणी तिचा बाॅयफ्रेंड शिझान खानला(Sheezan Khan) अटक करण्यात आलं आहे.

शिझानला अटक केल्यापासून शिझानचे कुटुंबिय सातत्यानं शिझान निर्दोष असल्याचा दावा करत आहे. त्यातच आता शिझानच्या आईनं सोशल मीडियावर केलेली एक भावूक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

शिझानच्या बहिणीला म्हणजेच फलक नाझला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिझानच्या आईनं फलकचा रूग्णालयातील एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे.

त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, आमच्या कुटुंबाला कशाची शिक्षा मिळत आहे. माझा मुलगा शिझान एक महिन्यापासून विनाकारण जेलमध्ये आहे. मुलगी फलक रूग्णालयात आहे. तर दुसरा मुलगा ऑटिस्टिक आजारानं ग्रस्त आहे. मला अशा परिस्थीत काय करावे, असा प्रश्न मला पडला आहे असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

फलक आणि तुनिषाचे संबंध सलोख्याचे होते, असं असताना देखील आम्हाला नावं ठवेली जात आहेत. आम्ही मुस्लिम आहोत हा आमचा गुन्हा आहे का ?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-