“मी नाही तर ‘हा’ खेळाडू ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ पुरस्काराचा खरा मानकरी”

“मी नाही तर ‘हा’ खेळाडू ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ पुरस्काराचा खरा मानकरी”

लंडन | न्यूझीलंडने जाहीर केलेल्या ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ हा सर्वोच्च पुरस्कार इंग्लंडचा अष्टपैलू    खेळाडू बेन स्टोक्स याने नाकरला आहे. त्याने त्याबाबत प्रसिद्धीपत्रक काढलं आहे.

‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ हा पुरस्कार नाकारताना स्टोक्सने पुरस्काराचा खरा मानकरी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आहे. तो विलियमसनलाच देण्यात यावा, अशी विनंती स्टोक्सने न्यूझीलंड सरकारला केली.

‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. याचा मला अत्यंत आनंद आहे. न्यूझीलंड आणि माझ्या माओरी पंरपरेचा मला अभिमान आहे. पण या पुरस्कारचा खरा मानकरी मी नाही, असंही स्टोक्स म्हणाला आहे.

न्यूझीलंडमधील सर्व नागरिकांनी पुरस्कारासाठी विलियमसनला पाठिंबा दिला पाहिजे. मी सुद्धा माझं मत त्यालाच देणार, असं बेन स्टोक्स म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“…म्हणून अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा खात्मा करता आला”

“सरकार आपल्या फायद्यासाठी माहिती अधिकार कायद्यात बदल करतंय”

-खासदार अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादी काँग्रेस सोपवणार मोठी जबाबदारी?

-पक्षाची बदनामी टाळण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांच्या विनयभंगाकडे भाजपचं दुर्लक्ष?

-पहिल्याच भाषणात कार्यकर्त्याला रडू कोसळलं; अन् सावरायला सरसावले धनंजय मुंडे

Google+ Linkedin