Benefits of clove | सर्दी-खोकल्याच्या त्रासाने त्रस्त आहात?, मग करा ‘हा’ उपाय

Benefits of clove | बदलत्या हवामानाचा प्रभाव आरोग्यावर लवकर पडत असतो. त्यातच, हिवाळा सुरू झाला आहे. सध्या अचानकच ऊन आणि अचानकच थंडी असे वतावरणीय बदल होत आहेत. वातावरण बदलले की, बऱ्याच जणांना सर्दी-खोकला, ताप असे आजार होतात. त्यात सर्दी साधारण आठवडा भर असतेच. यावर आता एक रामबाण उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

काही घरगुती उपाय केले तर, सर्दी-खोकल्याला आराम मिळू शकतो. अशीच आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होणारी गोष्ट म्हणजे लवंगचे फायदे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. लवंगचा वापर करून तुम्ही सर्दी-खोकल्यावर आराम मिळवू शकता. लवंग मधात मिसळून खाल्ल्यामुळे कोरड्या आणि ओल्या खोकल्यापासून लगेच आराम मिळतो.

‘असा’ करा लवंगचा वापर

सात-आठ लवंग घेऊन त्या तव्यावर हलक्या हाताने भाजून घ्या. यामध्ये साधारण 3-4 चमचे मध टाका. थोडे गरम करून सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी एक चमचा खाल्ल्याने खोकल्याला त्वरित आराम मिळतो. यावर अर्धा तास पाणी पिऊ नये. तुम्हाला दोन-चार दिवसांमध्येच फरक जाणवायला लागेल.

त्यामुळे हिवाळ्यात लवंगचा वापर (Benefits of clove ) आहारात करायलाच हवा. लवंग हा एक महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. आयुर्वेदामध्ये लवंग खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. त्यात सर्दी-खोकला हा लवकर बरा होत नाही. मात्र, या लवंगचा वापर करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत

लवंग (Benefits of clove ) हा भरपूर कारणांसाठी फायदेशीर आहे. लवंगमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते. लवंगाच्या तेलात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे दाह कमी करण्यास मदत करतात. यासोबतच लवंगमधील युजेनॉल आणि जंतुनाशक घटक दात आणि हिरड्यांच्या दुखण्यावर आराम देते. या व्यतिरिक्त तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठीही लवंगचा वापर करतात. म्हणूनच लवंग चघळा असे नेहमी सांगितले जाते.

लवंग खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच यकृताचे आरोग्य सुधारते. लवंगमधील पोषकतत्त्वे हाडे मजबूत करतात. यामुळे खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवता येते,याने वजन कमी करण्यास मदत मिळते. सकाळच्या वेळेस लवंग खाल्ल्यास वाताच्या समस्येपासून देखील आराम मिळतो. लवंगमधील युजेनॉल कर्करोगासारख्या गंभीर आजारांना रोखण्यासाठीही प्रभावी ठरू शकते.

News Title- Benefits of clove

महत्वाच्या बातम्या- 

MS Dhoni | महेंद्रसिंग धोनी सापडला मोठ्या संकटात, ‘या’ कारणामुळे दाखल झाली केस

Aishwarya Rai घटस्फोटांच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच बोलली, अभिषेक बच्चनला थेट म्हणाली…

94 लाख परिवारांचं नशीब उजळलं, प्रत्येक कुटुंबाला मिळणार 2 लाख रुपये!

Jaya Bachchan l Amitabh Bacchan नव्हे, मला हा हिरो आवडायचा!; जया बच्चन यांचा सर्वात मोठा खुलासा

Gold Rate Today l सोनं झालं स्वस्त! पाहा आजचे दर