benefits of eating honey | मध (Honey) आरोग्यासाठी (Health) किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मधातील औषधी गुणधर्मांमुळे (Medicinal Properties) आयुर्वेदातही (Ayurveda) याला खूप महत्त्व आहे. विविध उपचारांमध्ये (Treatments) मधाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. मधात अनेक खनिजे (Minerals) आणि जीवनसत्त्वे (Vitamins) असतात जी शरीरासाठी आवश्यक असतात. (benefits of eating honey)
एम्स (AIIMS), हार्वर्ड (Harvard), स्टॅनफोर्डमध्ये (Stanford) प्रशिक्षण घेतलेले आणि जवळपास २० वर्षांपासून प्रॅक्टिस करणारे डॉ. सेठी (Dr. Saurabh Sethi) यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी १४ दिवस मध खाल्ल्यास शरीरावर काय प्रभाव पडतो हे सांगितले आहे. डॉ. सेठी हे कॅलिफोर्नियामध्ये (California) गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (Gastroenterologist) असून त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिन (Doctor of Medicine) आणि मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (Master of Public Health) केले आहे.
१४ दिवस मध खाल्ल्यास शरीरावर होणारे परिणाम
डॉ. सेठी यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने १४ दिवस रोज मध खाल्ले तर शरीराला अनेक फायदे मिळतील, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. मधात १५० पेक्षा जास्त वेगवेगळे घटक असतात, ज्यात अँटी-ऑक्सिडंट्स (Antioxidants), जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो अॅसिड (Amino Acids) यांचा समावेश आहे. हे सर्व पोषक घटक (Nutrients) साखरेमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवतात. (benefits of eating honey)
आतड्यांचे आणि यकृताचे आरोग्य सुधारते
नियमितपणे मध खाल्ल्याने आतड्यातील चांगले बॅक्टेरिया (Gut Bacteria) वाढतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. तसेच, यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस (Oxidative Stress) कमी होऊन यकृताचे (Liver) आरोग्य सुधारण्यास मदत होते.
झोपेची गुणवत्ता सुधारते
रात्री थोड्या प्रमाणात मध खाल्ल्याने मेलाटोनिन (Melatonin) संप्रेरक (Hormone) स्रवते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. कच्चा मध (Raw Honey) खाणे सर्वात चांगले, कारण मध गरम केल्यावर त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. (benefits of eating honey)
इतर फायदे
रोगप्रतिकारशक्ती वाढते: रोज मध खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.
झोपेची समस्या दूर होते: रात्री झोप येत नसेल तर १ चमचा मध खा. तुम्हाला चांगली झोप येईल.
Title : benefits of eating honey
महत्वाच्या बातम्या-
आधार कार्डवर मिळतं 2 लाखांचं कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती…
भाजप आमदाराला पुत्रशोक, लेकाच्या अचानक मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मोठी बातमी! आधी सरपंच आता आणखी एक संशयास्पद मृत्यू, बीडमध्ये खळबळ
Demat Account वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, ‘हा’ नवा नियम वाचाच