Benefits Of Soaked Raisins | सकाळी उठल्यावर बरेच जण सुका मेवा खात असतात. त्यासाठी रात्रीच काजू, बदाम पाण्यात भिजवायला ठेवले जातात. बदाम खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर रोज सकाळी मनुके खाल्ल्याने देखील अनेक फायदे शरीराला होतात. त्यात भिजवलेले मनुके खाण्याचे तर (Benefits Of Soaked Raisins) अनेक फायदे आहेत.
भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे
-मनुके खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. बीपीच्या(Benefits Of Soaked Raisins) रुग्णांनी दररोज भिजवलेले मनुके खाल्ल्यास त्यांचे बीपी नॉर्मल राहण्यास मदत होते.
-वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मनुका खाणे खूप प्रभावी आहे. मनुका फायबरने समृद्ध असतात. मनुके रोज खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे भूक लागत नाही.
-थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी देखील मनुका खाणे खूप जास्त फायदेशीर ठरते.
-मनुका फायबर, पॉलीफेनॉल्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक ऍसिडमध्ये समृद्ध असतात. यामुळे अँटिऑक्सिडंटचे प्रमाण वाढते. यामुळे थायरॉईड संप्रेरक पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
-मनुक्यांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत होते.टाईप-2 मधुमेहाचे रुग्ण याच्या सेवनाने शुगर नियंत्रित करू शकतात.
-मनुक्यांमध्ये लोह असते, जे हिमोग्लोबिन (Benefits Of Soaked Raisins) तयार करण्यास मदत करते. हिमोग्लोबिन शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते. त्यामुळे मनुका खाल्ल्याने थकवा कमी होतो.
-मनुका हे अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात, जे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतात. ऑक्सिडेटिव्ह पेशींचे नुकसान करते आणि कर्करोगाचा धोका वाढवते. त्यामुळे मनुके खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होतो.
News Title : Benefits Of Soaked Raisins
महत्त्वाच्या बातम्या-
ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोनं झालं स्वस्त, 10 ग्रॅमसाठी आता..
सतर्क! राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
“कंगना राणौतचा चेहरा पाहिला तर पाप..”; शंकराचार्य यांचं वक्तव्य चर्चेत
आज ‘या’ राशी होतील धनवान; गुंतवणुकीतून मिळेल बक्कळ पैसा
“खड्ड्यांचं पुणं झालंय, त्यांना खड्डापुरुष पुरस्कार द्या”; उद्धव ठाकरे गडकरींवर बरसले