रोज एक अक्रोड खाल्ल्याने मिळतील ‘इतके’ फायदे!

Benefits of Walnut | अक्रोड हे पोषक तत्वांनी समृद्ध असते. अक्रोडचा वापर अनेक पदार्थांमध्ये देखील केला जातो. अक्रोड खाण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे रोज एक अक्रोड निरोगी आरोग्यासाठी (Benefits of Walnut) खायलाच हवे. जाणून घेऊयात रोज एक अक्रोड खाण्याचे फायदे.

अक्रोड खाण्याचे फायदे

हृदयाचे आरोग्य : अक्रोडमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, जे खराब कोलेस्ट्रॉलची (LDL) पातळी कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

मेंदूचे कार्य : अक्रोडमधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड हे मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका कमी होतो.

अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म : अक्रोडात भरपूर प्रमाणात antioxidants असतात, जे तुमच्या पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. अक्रोडमध्ये (Benefits of Walnut) असलेल्या पॉलिफेनॉल आणि फायटोन्यूट्रिएंट्समध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यास मदत : अक्रोड मध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असल्या तरी वजन व्यवस्थापनात मदत होते. यामध्ये असलेले हाय फायबर आणि प्रथिने भूक नियंत्रित करतात. परिणामी, वजन कमी होण्यास मदत मिळते.

पचनक्रिया सुधारते : अक्रोडमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरात पोषक द्रव्यांचे शोषण वाढते. अक्रोडमध्ये फायबर असते. यामुळे पचनशक्ती वाढते.

हाडांचे आरोग्य : अक्रोडमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या महत्त्वपूर्ण पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते.यामुळे हाडे मजबूत राहतात. त्यामुळे अक्रोड शरीरसाठी फायदेशीर ठरते.

त्वचेचे आरोग्य : अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स (Benefits of Walnut) आणि जीवनसत्त्वे, विशेषत: व्हिटॅमिन ई असतात, जे त्वचेच्या आरोग्यास मदत करतात.

News Title –  Benefits of Walnut

महत्त्वाच्या बातम्या-

पावसाळ्यात रम प्यावी की ब्रँडी?, आरोग्यासाठी हे खरंच चांगलं आहे का?

“हिंदूंनो धर्म वाचवण्यासाठी कामाला लागा, नाहीतर…”; केतकी चितळेची पोस्ट प्रचंड चर्चेत

“लग्न होईपर्यंत आपण सेक्स करायचं…”; ‘हिरामंडी’ फेम ‘या’ अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

“मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ मग आम्ही कोण?”; तृतीयपंथीयांचा सवाल

राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनदर