बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लोकांनी इंदिरा गांधींना ज्या पद्धतीने उत्तर दिलं, तसंच उत्तर आता मोदींनाही मिळेल”

नवी दिल्ली |  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांची देखील भेट घेतली. ममता यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळे त्यांचा हा दौरा विशेष चर्चेत राहिला. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना इंदिरा गांधी यांच्यासोबत करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, ‘नरेंद्र मोदींनी शेतकरी आंदोलन ज्या पद्धतीने हाताळलं ते चुकीचं होतं. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणिबाणी लागू झाली, त्याला लोकांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं होतं, तसंच उत्तर आताही जनता मोदींना देईल.”

पुढे त्या म्हणाल्या, ‘इंदिरा गांधी या शक्तीशाली नेत्या होत्या. पण आणिबाणी लागू केल्यानंतर सगळंच बदललं. त्यानंतर त्यांनी देशाची माफी देखील मागितली. मात्र, लोकांनी त्यांना माफ केलं नाही. आपल्या पंतप्रधानांनी देखील शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण त्यांनाही माफी मिळणार नाही,’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जींनी दौऱ्यावर असताना ‘सिल्वर ओक’मध्ये शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यूपीएवर टीका करत काँग्रेसवर निशाणा साधला होता.  युपीए आहे कुठे देशात? युपीए अस्तित्वात नाही. आम्ही सर्व समस्या सोडवू, आम्हाला एक सक्षम पर्याय हवा आहेे, असं त्या म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

…त्यातून नागपूरने 325 कोटी कमवले, काहीच टाकाऊ नसतं-नितीन गडकरी

मोठी बातमी! माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं अखेर निलंबन

ओमिक्रॉनची धास्ती; बुस्टर डोस घ्यायचा की नाही?; नीति आयोगाने दिली ‘ही’ माहिती

तेलंगणातून चिंता वाढवणारी बातमी समोर, तब्बल ‘इतके’ विद्यार्थी सापडले पॉझिटीव्ह

‘मी सीडी काढली तर…’; मलिकांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More