बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यपाल धनखड भ्रष्टाचारी आहेत, त्यांना काढून टाकलं पाहिजे”

कोलकत्ता | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्य सचिवालयात पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की,  राज्यपाल एक भ्रष्ट माणूस आहेत. 1996 च्या हवाला जैन प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. केंद्र सरकारने राज्यपालांना अशाप्रकारे पदावर राहण्याची अनुमती का दिली आहे?

पुढे बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, धनखड यांचा उत्तर बंगाल दौरा ही फक्त एक ‘राजकीय चाल’ होती कारण त्यांना या दौऱ्यादरम्यान फक्त भाजपचे आमदार आणि खासदार भेटले. त्यांनी अचानक उत्तर बंगालचा दौरा का केला? मला उत्तर बंगाल विभाजित करण्यासाठीचे हे एक षडयंत्र वाटत आहे.

तसेच जगदीप धनखड यांना हटविण्यासाठी मी केंद्राला अनेक पत्र लिहिलं आहे. संविधानानुसार मी त्यांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे आणि सर्व शिष्टाचार पाळणे सुरू ठेवणार आहे. परंतु केंद्र सरकारने माझ्या पत्रांच्या विचार केला पाहिजे, असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेची समज नाही, म्हणून ‘कर्जाचे डोस’ देऊन काम चालू आहे”

‘नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे’; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेलाही टाकलं मागे; भारताचा लसीकरणात नवा उच्चांक

देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत, याहून मोठा सन्मान काय असेल- भाजप

सोन्याच्या वायदे बाजारात तेजी, चांदी देखील वाढली; वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More