विराट कोहलीच्या बंगळुरुचा आणखी एक धक्कादायक पराभव

Photo- BCCI

बंगळुरु | यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या बंगळुरुला सूर सापडत नाहीये. पंजाबविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुला १९ धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं.

बंगळुरुने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने बंगळुरुपुढे विजयासाठी अवघ्या १३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बंगळुरुचा संपूर्ण संघ ११९ धावात गारद झाला. संदीप शर्माला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं.