Black Edition Cars | भारतीय कार बाजारात ऑल-ब्लॅक थीम असलेल्या कार्सची मागणी वाढत आहे. या कार्समध्ये फक्त बाहेरच नाही तर आतही संपूर्ण ब्लॅक थीम दिली जाते. Tata, Hyundai आणि MG यांसारख्या कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय कार्सच्या ब्लॅक एडिशन मॉडेल्स सादर केल्या आहेत. जर तुम्ही 15 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत ऑल-ब्लॅक थीम असलेली कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी बेस्ट 7 पर्याय खाली दिले आहेत. (Black Edition Cars )
ऑल-ब्लॅक एडिशन कार्स
1. MG Comet EV Blackstorm Edition : याची किंमत ही 7.80 लाख (एक्स-शोरूम) असून MG ची ही इलेक्ट्रिक कार ऑल-ब्लॅक थीमसह येते. कॉम्पॅक्ट डिझाइन आणि इको-फ्रेंडली फीचर्समुळे ही शहरी भागात लोकप्रिय आहे.
2. Hyundai Exter Knight Edition : यांची किंमत 8.46 लाख (एक्स-शोरूम) असून Hyundai ने 2024 मध्ये Exter चा नाइट एडिशन लॉन्च केला. यात ब्लॅक-आउट बॅज, ब्लॅक अलॉय व्हील्स, रेड ब्रेक कॅलिपर्स आणि ब्लॅक इंटीरियर थीम दिली आहे.
3. Tata Altroz Dark Edition : याची किंमत 9.50 लाख (एक्स-शोरूम) असून Tata Altroz Dark Edition मध्ये ऑल-ब्लॅक ग्रिल, ब्लॅक अलॉय व्हील्स आणि ब्लॅक इंटीरियर थीम मिळते. फ्रंट फेंडरवर ‘डार्क एडिशन’ बॅज आणि सीट्सवर डार्क एम्बॉसिंग दिले आहे.
4. Hyundai Venue Knight Edition : याची किंमत 10.35 लाख (एक्स-शोरूम) असून Venue च्या नाइट एडिशनमध्ये ग्रिल, स्टीयरिंग व्हील आणि एसी वेंट्सवर कॉपर कलरचे टच आहेत. ब्लॅक सीट्स आणि डॅशबोर्डसह हे एक स्टायलिश पर्याय आहे.
5. Tata Nexon Dark Edition : याची किंमत11.70 लाख (एक्स-शोरूम) असून Nexon चा डार्क एडिशन विविध व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. यात ऑल-ब्लॅक एक्सटीरियर, डार्क थीम इंटीरियर आणि फ्रंट फेंडरवर ‘डार्क एडिशन’ बॅज दिला जातो. (Black Edition Cars )
6. MG Astor Blackstorm Edition : याची किंमत 13.65 लाख (एक्स-शोरूम) असून MG Astor च्या ब्लॅकस्ट्रोम एडिशनमध्ये ब्लॅक बॉडी क्लॅडिंग आणि रेड इन्सर्ट्स असलेला आकर्षक एक्सटीरियर मिळतो. केबिनही पूर्णतः ब्लॅक थीममध्ये आहे.
7. Hyundai Creta Knight Edition : याची किंमत14.62 लाख (एक्स-शोरूम) Hyundai Creta Knight Edition मध्ये 17-इंच ब्लॅक अलॉय व्हील्स, ब्लॅक ग्रिल, डार्क क्रोम एलिमेंट्स आणि ब्लॅक इंटीरियर दिले आहे.
Title : Best Budget Black Edition Cars