बस अचानक सुरु झाली अन् पुढं घडलं भयंकर!

Mumbai News

Mumbai l आजकाल मुंबईकर सुखकर प्रवास करायचा असल्यास बेस्ट बसला प्राधान्य देतात. कारण बेस्ट बसने कमी खर्चात सुखकर प्रवास होतो. मात्र आता बेस्ट बस दोन जणांच्या जीवावर बेतली आहे. मुंबईतील विक्रोळी परिसरात अपघाताची एक धक्कादायक घटना घडली आहे.

बेस्ट बसने दोन जणांना दिली धडक :

आज विक्रोळीतील कन्नमवार नगर भागात बेस्ट बसने दोन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. यावेळी विक्रोळीतील कन्नमवार नगर या भागात बेस्ट बसचा डेपो आहे. मात्र आज याठिकाणी चालू अवस्थेत असलेली बस अचानक पुढे आली आणि दोन जणांना जोराची धडक दिली. मात्र या धडकेत दोन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या धक्कादायक अपघाताची घटना घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दोघांनाही स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. मात्र या घटनेतील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai l या प्रकरणाची बेस्ट प्रशासन चौकशी करणार :

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीच्या कन्नमवारनगर या परिसरात बेस्ट बस चालक हा बस सुरू ठेवून नियंत्रण कक्षात गेला होता. मात्र यावेळी ही बस अचानक सुरू झाली आणि वेगानं एका चहाच्या स्टॉलला धडकली. दरम्यान, या चहाच्या स्टॉलसमोर उभे असलेले दोघेजण गंभीररित्या जखमी झाले.

मात्र या अपघाताची घटना समोर आल्यानंतर दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र आता हा संपूर्ण नेमका प्रकार काय होता? याची चौकशी बेस्ट प्रशासन करणार आहे. तसेच या घटनेतील बस चालकावर देखील कुठला गुन्हा दाखल होतो का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.

News Title : Best Bus Accident in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या-

बीडमध्ये एका महिन्यात घडल्या मोठ्या घडामोडी? जाणून घ्या संपूर्ण घटना एका क्लिकवर

प्रसिद्ध अभिनेत्याला आला हार्टअटॅक, बातमीने सिनेसृष्टीत उडाली खळबळ

वाल्मिक कराडवर MCOCA का लागला नाही?, मोठं कारण समोर

वाल्मिक कराड इतक्या दिवस जेलमध्ये राहणार, समोर आली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! सरपंच हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, मात्र वाल्मिक कराडवर…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .