Financial Transactions Tips l दैनंदिन जीवनात आपण अनेक वेळा पैशांचे व्यवहार करतो. कोणाला कर्ज देणे, कोणाकडून पैसे घेणे, एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करणे हे सगळेच आपल्याला वेळोवेळी करावे लागते. पण, अनेक वेळा असे व्यवहार अडचणीत येतात, पैसे अडकतात, नुकसान होते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात अशा आर्थिक व्यवहारांसाठी काही विशिष्ट दिवस शुभ मानले गेले आहेत. (Financial Transactions Tips)
शास्त्रांनुसार योग्य दिवशी व्यवहार केल्यास तुमचं धन सुरक्षित राहते, त्यातून फायदा होतो आणि परत मिळण्याची शक्यता वाढते. चला तर मग जाणून घेऊया कोणते दिवस पैशांच्या देवाणघेवाणीसाठी योग्य आहेत आणि कोणते दिवस टाळावेत.
हे दिवस व्यवहारासाठी अशुभ मानले जातात :
शुक्रवार: या दिवशी एखाद्याला पैसे उधार दिल्यास ते परत मिळण्याची शक्यता कमी असते. म्हणून शुक्रवारी कर्ज किंवा उधारीचा व्यवहार टाळावा. मात्र, गरजू व्यक्तीला मदतीच्या स्वरूपात दान करता येते. (Financial Transactions Tips)
रविवार: रविवारी पैसे दिल्यास आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवशीही आर्थिक व्यवहार टाळावेत.
बुधवार: बुधवारी पैसे उधार दिल्यास भविष्यात गुंतवणूक किंवा व्यवसायात नुकसान होऊ शकते. (Financial Transactions Tips)
गुरुवार: गुरुवारी पैसे देणे हे देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो. यामुळे घरात आर्थिक अडचणी वाढू शकतात.
मंगळवार: मंगळ हा कर्जाचा कारक ग्रह मानला जातो. मंगळवारी दिलेले कर्ज परत मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे मंगळवारी कर्ज घेणे किंवा देणे टाळा.
Financial Transactions Tips l हे दिवस मानले जातात आर्थिक व्यवहारांसाठी शुभ :
सोमवार: सोमवारी आर्थिक व्यवहार, कर्ज घेणे किंवा देणे यासाठी शुभ मानले जाते. या दिवशी केलेले व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.
शनिवार: जरी काहींच्या मते शनिवार दुर्बल दिवस मानला जातो, तरी शनिवारी केलेले आर्थिक व्यवहार, विशेषतः लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी लाभदायक ठरतात. (Financial Transactions Tips)
गुरुवार (विशिष्ट प्रसंगी): काही विशेष मुहूर्तांमध्ये गुरुवार शुभ मानला जातो, विशेषतः धार्मिक कार्यासाठी खर्च करताना.