बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रेयसीनं दगा दिला म्हणजे प्रियकराला…”; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निकाल

नागपूर | आपण अनेकदा आपल्या सभोवताली प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याचं ऐकत असतो. कधी एकतर्फी प्रेमातून तर कधी प्रेमातील धोक्यातून प्रियकर अथवा प्रेयसी आपलं जीवन संपवत असतात. प्रेमात दगा झाला म्हणून प्रेयसी आणि प्रियकराची भांडणं आपण अनेकदा पाहात असतो. आताही उच्च न्यायालयानं प्रेयसी आणि प्रियकर यांच्या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका प्रेमप्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयानं निकाल दिला आहे. प्रेयसीनं दगा दिला म्हणजे प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा त्याचा अर्थ होत नाही, असा महत्वाचा निकाल न्यायालयानं दिला आहे. हा निकाल देताना न्यायालयानं संबंधित तरूणीला दिलासा दिला आहे. तिच्या विरोधातील सर्व गुन्हे रद्दबातल ठरवले आहेत.

संबंधित तरूणीचे 2018 पासून प्रणय मोरे नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्यांचे प्रेमप्रकरण चालू असताना तरूणी एअर हाॅस्टेसच्या प्रशिक्षणासाठी लखनऊला गेली. प्रणयला तिच्यावर संशय आल्यानं त्यानं तिच्याशी वाद घातला होता. तरूणीनं अनेकदा प्रणयला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा संशय वाढतच गेला. तरूणी लखनऊवरून परत येताच प्रणय तिला आपल्या कळमेश्वर येथील खोलीवर घेऊन गेला. तरूणी झोपेत असताना प्रणयनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परिणामी हे प्रकरण नागपूरसह राज्यभर गाजलं होतं.

दरम्यान, कमळेश्वर पोलिसांनी तरूणीवर प्रणयला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तरूणीनं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संबंधित तरूणीला नागपूर खंडपीठानं दिलासा दिला आहे.

थोडक्यात बातम्या 

“चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल”

…अन् क्षणात भलं मोठं घर कोसळलं, पाहा केरळमधील थरारक व्हिडीओ

भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन मोठ्या नेत्यांचा पक्षाला रामराम

“पवारांचा एकेरी उल्लेख करणं पाटलांना शोभतं का? कुठे हिमालय, कुठे टेकाड टेंगूळ”

“ईडी, सीबीआय यांच्यासह किरीट सोमय्यांना जम्मू-काश्मिरला पाठवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More