सावधान! तुम्ही प्लास्टिकचं तांदूळ खाताय का?; असं ओळखा खरं तांदूळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मध्यंतरी प्लास्टिकच्या तांदळाची (Rice) भेसळ उघड पडली होती. हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ असते. या भेसळीमुळं अनेक भयंकर प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. चीनमध्ये अशा प्रकारचा तांदूळ बनवला जातो. यामुळे बनावट तांदूळ कसे ओळखायचे याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

खरंतर प्लास्टिकचा तांदूळ शिजवल्यानंतरदेखील तो खरा की खोटा ओळखता येत नाही. तुम्ही मात्र सुगंधावरुन (fragrance) तांदूळ ओळखू शकता. बासमती तांदळाला सुगंध असतो. हा बासमती तांदूळ नेपाळ(Nepal), भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये केला जातो. हा तांदूळ लांब पारदर्शक आणि सुगंधीत असतो. तो शिजवल्यानंतर चिकटत नाही.

चुन्याचा वापर करुन देखील तुम्ही हा तांदूळ ओळखू शकता. चुना आणि पाण्याचे मिश्रण करा. तादंळाचे काही नमुने त्या चुनामिश्रित पाण्यात घालून ठेवा. थोडा वेळ थांबा. त्यानंतर तांदळाचा रंग बाहेर पडला किंवा बदलला तर समजून जा की ते प्लास्टिकचं (Plastic) तांदूळ आहे.

तांदूळ प्लास्टीकचा असेल तर तो गरम तेलात (Oil) टाकल्यावर वितळू लागेल. तांदूळ गॅसवर (Gas) किंवा आगीवर ठेवा, जळताना प्लास्टिक जळल्यासारखा वास येत असेल तर तो प्लास्टिकचा तांदूळ आहे. प्लास्टिकचा तांदूळ पाण्यात टाकल्यानंतर तरंगायला लागतो. तांदूळ शिजवल्यानंतर काही दिवस तसाच ठेवा जर त्या तांदळाला वास सुटला तर ते नैसर्गिक आहे, (natural) तसं न झाल्यास तो प्लास्टिकचा तांदूळ आहे.

महत्त्वाच्या बातम्या