बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोख व्यवहार करणाऱ्यांनो वेळीच व्हा सावधान; 10 व्यवहार केल्यानंतर….

नवी दिल्ली | सर्व आर्थिक व्यवहार कॅशलेस होऊन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी मोदी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजणा राबवल्या जात आहेत. तसेच कॅशलेस व्यवहारांना काही प्रमाणात सूट दिली जात आहे. मात्र असं असताना देखील काही लोक छोट्या मोठ्या व्यवहारांसाठी रोख रक्कम वापरतात.

तुम्ही देखील रोख रक्कम मोठ्या प्रमाणात वापरत असाल तर वेळीच सावधान व्हा. कारण आयकर विभागाने आता रोख व्यवहारांची दखल घेतली आहे. आयकर विभागाने लागू केलेले नियम तुम्ही नीट जाणून न घेता त्याची पायामल्ली केल्यास तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.

एका आर्थिक वर्षात बचत खात्यातून 10 लाखांहून अधिक तर चालू खात्यातून 50 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम काढल्यास बॅंक त्याची माहिती आयकर विभागाशी शेअर करतं. तसेच एका आर्थिक वर्षात 10 लाखांहून अधिक रक्कम मुदत ठेवींमध्ये जमा केली गेली तर त्याची देखील माहिती आयकर विभागाला कळवली जाते. ज्या बँकेच्या FD खात्यात ठेवीदारांनी मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ठेवली असेल त्या ठेवीदारांनाही आयकर विभाग नोटीस बजावू शकतं.

याचप्रमाणे एका आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डचे बील 10 लाखांहून अधिक झालं तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस बजावू शकतं. तसेच जर तुम्ही 10 लाखांहून अधिक रोख रक्कमेचा बँकेत डिमांड ड्राफ्ट बनवला तर तुम्हाला तुमच्या पॅनकार्डचा तपशील बॅंकेशी शेअर करावा लागेल.

थोडक्यात बातम्या –

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोदी सरकारचं कौतुक; काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

‘…अन्यथा पैसे काढता येणार नाहीत’; पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये- उद्धव ठाकरे

चिंताजनक! आता डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना अधिक धोका

महाविकास आघाडीची महत्वाची बैठक; तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांची हजेरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More