बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन् बॉडीबिल्डरचा फुटला बायसेप’; इंजेक्शन घेऊन बायसेप्स फुगवणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, पाहा व्हिडीओ

मॉस्को | सध्या प्रत्येकाला पिळदार बॉडी हवी असते. मात्र त्यासाठी व्यायाम आणि आहार हा वेळेवर लागतो. आजची पीढी जिमला जाते व्यायाम करत आपली बॉडी वाढवण्यासाठी शॉर्टकच मारण्याचा प्रयत्न करते. काही तरूण कमी वेळात आपली बॉडी होण्यासाठी सप्लीमेंट किंवा स्टेरॉईड इंजेक्शन घेतात. अशाच प्रकारे रशियातील एका बॉडीबिल्डरला इंजेक्शन घेणं चागलंच महागात पडलं आहे.

रशियातील बॉडीबिल्डर किरिल टेरेशिनने आपली बॉडी बनवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग निवडला होता. त्याला याचं भयंकर परिणाम भोगावे लागले आहेत. फायटिंगच्या रिंगणात प्रतिस्पर्धेला पंच मारताना टेरेशिनचे बायसेप्स फुटले. त्यानंतर हा सगळा प्रकार लोकांना कळावा म्हणून टेरेशिनने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

किरिल टेरेशिनने वयाच्या 20 व्या वर्षापासून इंजेक्शन घ्यायला सुरूवात केली होती. 2020 साली त्याने हे सिंथोल तेल इंजेक्शन घेतलं होतं. हे तेल दंडामध्ये जमा होतं आणि बायसेप फुगतात मात्र ते दणकट नसतात. किरिल टेरेशिन आपले फुगलेले दंड घेऊन रिंगणात उतरला होता.

दरम्यान, किरिल टेरेशिन सध्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून आत्तापर्यंतच्या दोन सर्जरी झाल्या आहेत. कदाचित त्याचे हातही काढून टाकावे लागतात, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आपला नैसर्गिक व्यायाम करा आणि आपली बॉडी सुदृढ करा.

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी आधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

“वडेट्टीवार हा जातीयवादी माणूस”; विनायक मेटेंना वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

तालिबान्यांना जूगारून अफगाणिस्ताच्या रणरागिणी उतरल्या मैदानात, केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

अखेर तालिबानचं ठरलं! नव्या सरकारमध्ये तालिबान्यांनी केली ‘या’ नेत्याची निवड

सुशांत प्रकरणानंतर पोलीस सावध, आता सिद्धार्थ प्रकरणात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More