बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खोट्या कारणाने ई-पास बनवणाऱ्यांनो सावधान; पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

पुणे | महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊनला आता 15 मे पर्यंत वाढवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलं. लॉकडाऊन दरम्यान आंतरजिल्हा वाहतूक पूर्णपणे बंद केली असून अत्यावश्यक कारणासाठीच लोक घराबाहेर पडू शकतात. त्याबरोबरच आंतरजिल्हा वाहतुकीसाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे.

आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासला अर्ज मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत. पण त्यासाठी खोटी कारणं देण्याचाही प्रकार सर्रास सुरू आहे. पास काढून देण्यासाठी पुण्यात एका तरुणाने खोटी कारणे देऊन बनावट ई-पास बनवण्याचा धंदा सुरू केला. तसेच डिजिटल पास काढून देण्यासाठी दुसऱ्याची कागदपत्रे वापरून तो तरुण पाससाठी अर्ज करायचा आणि नंतर पाससोबत छेडछाड करून बनावट पास बनवुन तो पास लोकांना विकायचा.

धनाजी मुरलीधर गंगनमले या भेकराईनगर, फुरसुंगी येथे राहणाऱ्या तरुणाला या प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तरुणाने अत्यावश्यक सेवेची कारणं देऊन आणि दुसऱ्यांची कागदपत्रे वापरून जवळपास 18 डिजिटल पास काढले होते. परंतु त्याचा हा डाव फार काळ टिकू शकला नाही. एकाच लॅपटॉपवरून अनेक पाससाठीचे अर्ज येत असल्याचं श्रीधर खडके या पोलीस उपनिरीक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

चौकशीनंतर असं लक्षात आलं की, धनाजी हा वेबसाईटवरून पाससाठी अर्ज करतो आणि त्यानंतर पासमधील मजकूर बदलून पोलिसांचा लोगो वापरून बनावट पास बनवून त्याची लोकांना विक्री करतो. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत धनाजी याला ताब्यात घेतले असून त्याने आतापर्यंत 18 खोटी कारणं सांगून पाससाठी अर्ज केला असून, 6 बनावट पास घरी बसून पोलिसांचा लोगो वापरून बनवल्याचं स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोना ओसरण्यास महाराष्ट्रातूनच सुरुवात होणार; तज्ज्ञांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण

भारतात असणाऱ्या अमेरिकन नागरिकांना जो बायडेन यांचा अलर्ट; तात्काळ मायदेशी परतण्याच्या सूचना

राज्यात कोरोनाचा धोका वाढला; 24 तासात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यु

पृथ्वीच्या वादळाने कोलकाता नेस्तनाबूत, सलग सहा चौकार मारत शॉने रचला इतिहास, पाहा व्हिडीओ

देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केलं- देवेंद्र फडणवीस 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More