बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“होय बाबा, काय रे आज दुपारीच चंद्रावर?”; अजित पवारांच्या कार्यक्रमात जेव्हा येतो बेवडा…; पाहा व्हिडीओ

पुणे |  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांच्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे ओळखले जातात. अजित पवार त्यांच्या समर्थकांना आणि युवा कार्यकर्त्यांना व्यसानापासून दूर राहण्याच सल्ला देतात. मात्र शनिवारी त्यांच्याच कार्यक्रमामध्ये एक बेवडा शिरला आणि त्यांच्या पाया पडू लागला.

बारामती तालुक्यातील कटफळ येथे अजित पवार ड्रोनद्वारे भूमापन सर्वेक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करत होते. त्यावेळी बेवडा थेट अजित पवारांच्या पाया पडू लागला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, होय बाबा…होय बाबा… काय रे आज दुपारीच चंद्रावर?, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.

अजित पवार कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, बारामती येथे अवैध दारु दुकाने बंद करण्याची सुचना अजित पवारांनी केली.  आपण पाहिलं की, आज दुपारीच एक जण चंद्रावर गेला होता. आता श्रावण सुरू आहे. युवकांना व्यसनापासुन दुर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.

दरम्यान, बेवड्याचा अजित पवारांच्या पाया पडताना व्हिडीओ सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

शाळेनेच चुकीचे गुण बोर्डाला पाठवले; पुण्यातील प्रसिद्ध शाळेतील प्रकारानं खळबळ

इंग्लंडच्या भूमीत रोहितचा हिट-शो! षटकार ठोकत केलं परदेशातील पहिलं शतक; पाहा व्हिडीओ

कोरोना फक्त उद्धव ठाकरेंशी बोलतो, माझ्याशी बोलत नाही- चंद्रकांत पाटील

मी दिलेला शब्द पाळला आहे, राजू शेट्टी काही बोलत असतील तर…- शरद पवार 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More