बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सितारों से आगे जहाँ और भी हैं’; नवाब मलिकांचा शायरीतूून टोला

मुंबई | मुंबईतील क्रुझवर केलेल्या कारवाईनंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या चर्चेत आहे. आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर या वादात आता भाजप नेते आशिष शेलार यांनी उडी घेतली आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला आता नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सितारों से आगे जहाँ और भी हैं, अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं’, असं म्हणत नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. एक मंत्री सकाळ संध्याकाळ कुठली तरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. त्यानंतर नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर आरोप करत आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदार असताना आशिष शेलार यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेची आणि जबाबदारीची जाणीव असायला हवी. भारताचे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय भाजप नेते सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे आहे. क्रूझ जहाजांसाठी सर्व परवानग्या त्यांच्या द्वारे मंजूर केल्या जातात, असं मलिक म्हणाले

डीजी शिपिंग जे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. राज्य सरकारची भूमिका किंवा जबाबदारी नाही. आशिष शेलार यांनी पोर्टल्स, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने क्रूझ जहाजाला दिलेल्या परवानग्या तपासल्या पाहिजेत, त्याचा पाठपुरावा करा आणि हाच या प्रकरणाचा तार्किक शेवट असेल, असं देखील मलिक म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्र तुळशीचे वृंदावन आहे, इथं गांज्या आणि भांग पिकवू नका”

“एक मंत्री सकाळ संध्याकाळ कुठली तरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय”

‘आज गोपीनाथराव असते तर त्यांनी…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

‘बाळासाहेब थोरातांनी जाहीरपणे सांगावं की त्यांनी…’; विखे पाटलांचं थोरातांना आव्हान

भारताविरूद्ध पाकिस्तानचे ‘हे’ 11 खेळाडू मैदानात उतरणार; पाकिस्तानचा संघ जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More