महाराष्ट्र मुंबई

महाविद्यालये अजून सुरू का नाहीत?; भगतसिंह कोश्यारींचा सरकारला सवाल

File Photo

मंबई | राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता तसेच राज्यातील सर्व 20 विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

महाविद्यालयांतील वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. विद्यार्थ्यांचीही तशीच मागणी आहे. मात्र सरकारच्या परवानगीशिवाय महाविद्यालये सुरू करता येत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी मागणी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. यानंतर महाविद्यालये सुरू न करण्याचा सरकारचा निर्णय विसंगत आणि विपरीत असल्याचं राज्यपाल म्हणालेत.

विद्यापीठांनी आपली शैक्षणिक वर्षे अगोदरच सुरू केली आहेत व ऑनलाईन पद्धतीने वर्गदेखील होत आहेत. आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अशा वेळी महाविद्यालयीन वर्ग सुरू करता येतील का किंवा पाळीमध्ये चालवता येतील का, याचा विद्यापीठांनी विचार करावा, असं राज्यपालांनी सांगितलं.

दरम्यान, विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू करण्याबाबतही लवकर निर्णय घ्यावा, असं कोश्यारींनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडंही जा”

अभिनेत्री कंगणा राणावत दिसणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत!

60 वर्षांपासून गुहेत वास्तव्य; राम मंदिरासाठी दान केलेली रक्कम ऐकाल तर हैराण व्हाल!

सातव्या बैठकीत ‘अण्णांचा हट्ट’ मागे; फडणवीसांच्या भेटीनंतर उपोषणाआधीच माघार

उद्धव ठाकरेंकडून फडणवीस सरकारचं कौतुक, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या