नाशिक | नाशिकमधील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली. यावेळी भगतिसंह कोश्यारींनी मी राज्यपाल नाही तर राज्यसेवक आहे, असं म्हटलंय.
दान देणाऱ्या दानशुरांमुळेच देश चालतो. अंध विद्यार्थ्यांकडून काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दैवी देणगी मिळाली आहे. त्यामुळे दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्यांना अभिवादन, असं कोश्यारी म्हणाले.
कोश्यारी यांनी गुलाबी गाव भिंतघर या ठिकाणीही हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्ट्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळही उपस्थित होते. यावेळी झिरवळ यांनी राज्यपालांकडे या भागाची समस्या मांडली.
झिरवळ सरकारमध्ये आहेत. पण ते माझ्याकडे मागणी करतात. मग राज्य सरकार काय करतंय?, असा सवाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
मला कोणी खलनायक ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे
करुणा धनंजय मुंडेंचा तक्रार अर्ज आला समोर; केलेत ‘हे’ 6 धक्कादायक आरोप
धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?- तृप्ती देसाई
एकीकडे आईचे आरोप तर दुसरीकडे… धनंजय मुंडेंच्या मुलीचा तो व्हिडीओ व्हायरल
‘पोलिसांनी मला सहकार्य न केल्यास…’; करूणा शर्मा यांनी दिला ‘हा’ इशारा