राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पारंपारिक नृत्य करून साजरी केली होळी, पाहा व्हिडिओ
देहरादून | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या मूळगावी उत्तराखंड येथे होळी साजरी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काही ठिकाणी होळी व रंगपंचमीवर प्रशासनातर्फे निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे होळीसाठी उत्तराखंड येथे गेले असून पारंपारिक होळी त्यांनी तिथे साजरी केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करून ‘आपला गृह प्रदेश असलेल्या उत्तराखंडमध्ये होल्यारोंचे आपल्या निवासस्थानी स्वागत केले आणि कुमाऊॅंनी खडी होळीमध्ये सहभाग घेतला’ असल्याचं सांगितलं आहे. त्याबरोबरच त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी पारंपारिक वाद्यांच्या तालावर नृत्य करून टाळी वाजवून कशी होळी साजरी केली त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वतः राज्यपालांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
राज्यपालांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते पारंपारिक वाद्यांच्या तालावर साद देत फुलांची उधळण करताना आणि नृत्य करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रात मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्ष्यात घेता होळी व रंगपंचमी या सणावर शासनातर्फे निर्बंध लादण्यात आले आहेत.
पाहा व्हिडिओ –
अपने गृह प्रदेश उत्तराखण्ड में होल्यारों का अपने आवास में स्वागत किया व कुमाऊँनी खड़ी होली में सहभागिता की । pic.twitter.com/zRtnQAvAre
— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) March 28, 2021
थोडक्यात बातम्या –
सचिन वाझेच्या अडचणीत आणखी वाढ; NIA पथकाला नदीपात्रात आढळले महत्वाचे पुरावे
मोठी बातमी!!! महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन?; मुख्यमंत्र्यांचे तयारीला लागण्याचे आदेश
गब्बर आणि हिटमॅन दोघंही सुपरहिट; केला ‘हा’ मोठा कारनामा
“उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवीन सरकार यावं”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.