Loading...

भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवणार?

नवी दिल्ली | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची बदली होण्याची चर्चा सुरु झालीय. त्यांच्या जागी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यात भाजपला अपयश आलं. या साऱ्या घडामोडींमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार टीका झाली. त्यामुळे प्रतिमा सुधारण्यासाठी केंद्र सरकार त्यांची दुसऱ्या राज्यात बदली करणार असल्याचं कळतंय.

Loading...

कलराज मिश्र यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी बराच काळ चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील राज्यपाल बदलाच्या चर्चांना सुरुवात झाली.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील अनेक पक्ष आणि संघटना देखील त्यांच्यावर नाराज आहेत. मराठी एकीकरण समितीने यासंदर्भात कालच मागणी केली होती.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...