बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किमान राज्यपालांनी तरी माझ्या नावाचा विचार करावा”

मुंबई | महाराष्ट्रातील लावणीसम्राज्ञी म्हणून सुरेखा पुणेकर या सर्वांनाच परिचयाच्या आहेत. मात्र आता तमाशाच्या फडातील सुरेखाताईंनी राजकारणाचा फड रंगवण्याचा विचार केला आहे. महाविकासआघाडी सरकारनं विधान परिषदेसाठी आपल्या नावाचा विचार करावा, असं वक्तव्य सुरेखाताईंनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी पुण्यातून काँग्रेस सुरेखाताईंना तिकीट देणार असल्याचं चर्चेत होतं. मात्र ताईंना तिकीट काही मिळालं नाही. त्यामुळे आता तरी विधान परिषदेसाठी तिकीट मिळावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

जर कुठल्याच पक्षाकडून मला विधान परिषदेसाठी तिकीट मिळालं नाही तर राज्यपालांनी तरी किमान माझ्या विचार करावा, अशी विनंतीही सुरेखाताईंनी केली आहे. विधान परिषदेच्या तिकीट वाटपावरून सर्वच पक्षांत नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता असताना सुरेखाताईंच्या इच्छेला किती स्थान मिळेल. हे पाहणं औत्स्युक्याचं असणार आहे.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी इच्छुक असलेल्यांनी आमदारपदी आपली वर्णी लागावी यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर अजून एकमत झालेलं नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

आता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी

महत्वाच्या बातम्या-

माझ्या नादी लागू नको नाहीतर तो व्हिडीओ… सोनू निगमची फिल्म इंडस्ट्रीतल्या या बड्या आसामीला धमकी

कोरोनाचा कहर…. गेल्या 24 तासांतली देशातली धक्कादायक आकडेवारी

नवविवाहितेची आत्महत्या; अंत्यविधीवेळी पतीनं केलेलं कृत्य ऐकून काळजाचा थरकाप उडेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More