बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली कोरोनाची लस

मुंबई | कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. सर्वांना लस कधी येईल? हा प्रश्न सतावत असताना लसही आली. पण लस आल्यानंतर देखील ही लस घ्यावी की नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे. लसीच्या चाचण्या पुर्ण होऊनही लस प्रभावकारी आहे की नाही? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधानांनी काही दिवसांपुर्वी स्वदेशी लस घेऊन कोरोनामुक्त भारत करण्याचं आवाहन केलं होतं.

आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून सर्व जनतेनी त्यासाठी नोंदणी करावी आणि आपली वेळ आल्यानंतर लस घ्यावी असं आवाहन त्यांनी या वेळी जनतेला केलं आहे. यावेळी डॉ. तात्याराव लहाने तिथे उपस्थित होते.

संपूर्ण देशात 1 मार्चपासून कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण करून घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात जाऊन लस घेतली.

राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणात लस घेण्यास सुरुवात केली असताना मल्लिकार्जुन खरगे यांनी काही दिवसांपु्र्वी माझे वय 70 पेक्षा जास्त आहे त्यामुळे कोरोनाची लस तरुणांना आधी दिली पाहिजे आणि त्यांचं आयुष्य वाढवलं पाहिजे. माझ्याकडे आता 10-15 वर्ष जीवन आहे असं मत व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा

रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा

शाहीनबाग आंदोलनाला तापसी, अनुरागने पैसा पुरवला- कंगना रनौत

बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का आहेत?- संजय राऊत

कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More