भगतसिंग कट्टरतावादी!, क्रांतिकारकांच्या नशिबी अपमान

मुंबई | भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे 3 क्रांतिकारी कट्टरतावादी आणि दहशतवादी होते असा धक्कादायक उल्लेख करण्यात आलाय. भारतीय इतिहास संशोधन परिषदेने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला.

देशातील अनेकांचे प्रेरणास्थान असलेले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अद्याप शहिदांचा दर्जा देण्यात आलेला नाही, अशी बाबही माहिती अधिकारातून समोर आलीय.

देशासाठी आपले बलिदान देणाऱ्यांना शहिदांचा दर्जा देण्यात आलाय का?, असा प्रश्न माहिती अधिकारातून विचारला होता. मात्र आतापर्यंत झालेल्या सरकारांनी 3 क्रांतिकारांकडे दुर्लक्षच केलं होतं.