बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी कोरोनाला कधीच घाबरलो नाही, कारण…- भगतसिंह कोश्यारी

मुंबई | कोरोनाच्या महामारीचा लोकांनी मोठा धसका घेतला होता. मात्र मी कधीही कोरोनाला घाबरलो नाही. ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

राजभवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी भगतसिंह कोश्यारी बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील आले होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोनाचा नारा दिला होता. या नाऱ्याचा उल्लेख भगतसिंह कोश्यारी यांनी भाषणादरम्यान केला.

काळजी घ्या, खबरदारी घ्या, हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळा, असं आवाहन यावेळी भगतसिंह कोश्यारींनी केलं आहे.

राजभवनमध्ये सतत लोक मला भेटत राहिले. टाळेबंदीच्या काळात ही मी लोकांना भेटणे सोडले नाही. आता तर राजभवन हे लोकभवन झाले आहे. मला लोक विचारतात की तुम्ही किती लोकांना राजभवन मध्ये भेटता, तुम्हाला कोरोना होण्याची भीती वाटत नाही का? त्यांना मी उत्तर देतो की ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!

आयआयटी प्रोफेसर असल्याची बतावणी करून व्यापाऱ्यांना घातला ‘इतक्या’ लाखांना गंडा

“मोदींना आणि योगींना मुलं नाहीत ते काय कुणाला देऊन जातील”

मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या मुलाला झाली कोरोनाची लागण

अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळत नाही- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More