राज्यपाल पुन्हा वादात; चप्पल घालून शहिदांना केलं अभिवादन

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh koshyari) हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम वादात सापडतात. पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत. कारण भगतसिंह कोश्यारी यांनी आज 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालूनच श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी अडचणीत सापडले आहे.

काँग्रेसने भगतसिंह कोश्यारींचा व्हिडीओ ट्विट करत कोश्यारींवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत राज्यपालांवर टीका केलीये.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यापाल चप्पल घालून शहिदांना श्रद्धांजली वाहत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच राज्यपालांच्या या कृतीवर संतापही व्यक्त केला आहे.

हाच व्हिडीओ गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र या राज्यपालांच्या ट्विटर हँडलवरही ट्विट करण्यात आलाय. यात देथील राज्यपाल पायात चप्पल घालूनच शहिदांना पुष्पगुच्छ अर्पण करताना दिसत आहेत.

अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती आणि महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झादरम्लेयान असते, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यपालांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावरून त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठलीये.

महत्त्वाच्या बातम्या-