बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात”

परभणी | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. कोश्यारी तीन दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड हिंगोलीनंतर ते आज परभणीत आहेत. ते वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात बोलत होते.

बांबु लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोस्ताहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या, असा सल्ला भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलं आहे. तसेच पंतप्रधान म्हणतात सब का साथ सबका विकास और सबका विश्वास या प्रमाणे सगळ्यांनी एकत्रित राहा, असंही राज्यपाल म्हणाले.

भगतसिंह कोश्यारी हे काल हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. संविधानाने मला जे अधिकार बहाल केले आहेत त्या अधिकारांचा वापर करून मी या जिल्ह्यात आलो आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, कोश्यारींनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.

थोडक्यात बातम्या-

पत्नीनं केलेल्या आरोपांनंतर अखेर हनी सिंगनं सोडलं मौन, म्हणाला…

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ‘ही’ 3 मंदिरे बंद; प्रवेशद्वारातूनही मिळणार नाही दर्शन

“ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी कोरोना विरोधातलं अमृत प्राशन केलंय का?”

सामन्यानंतर दीपक पुनियाच्या प्रशिक्षकानं केली रेफरीची धुलाई!

“स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More