“उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्राचं राज्यपाल (Governor) पद सोडल्यानंतर पहिल्यांदाच भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी त्यांच्या कार्यकाळातील राजकीय परिस्थितीवर पहिल्यांदाच भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संत माणूस असल्याचं म्हटलंय.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आलं. उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवलं, असं कोश्यारींनी म्हटलंय.

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता, असा टोलाही भगतसिंग कोश्यारी यांनी लगावला. 

हा सर्व नियतीचा खेळ असल्याचं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी मला विमानातून खाली उतरवलं नियतीने त्यांना सत्तेतून खाली खेचलं, असं कोश्यारी म्हणालेत.

उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यांनी यापासून लांब राहावं, अशी प्रार्थना मी देवापुढे करतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, त्यांनी संघटना चालवायला पाहिजे होती. उद्धव ठाकरेंना सुळीवर चढवण्यात आलं. मला त्यांच्यावर दया येते, असं भगतसिंग कोश्यारी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-