बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत नानांच्या पेहरावात भगीरथ दादा, राष्ट्रवादीचा सहानुभूतीचा प्रयत्न!

पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरूद्ध भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर मंगळवारी भगीरथ भालके हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यास निघाले, तेव्हा त्यांचं एक नव रूप सर्वांना पहायला मिळालं आहे.

आईचा आशीर्वाद घेऊन भगीरथ भालके उमेदवारी अर्ज भरायला निघाले. त्यावेळी भगीरथ भालके यांनी हुबेहुब वडिलांच्या स्टाईलप्रमाणे पायजमा शर्ट घातला होता. त्यांच्या या रूपाने कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या भारतनानांची आठवण आली. त्यांचा हा अंदाज मतदारसंघातील लोकांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या लुकची जोरदार चर्चा चालू आहे.

भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीसमोर एक तगड आव्हान देलं गेलं आहे. भगीरथ भालके यांना त्यांच्या वडिलांची सहानुभूती मिळू शकते तर, दुसरीकडे भाजप ही जागा जिंकण्यास पुर्ण जोर लावत आहे. पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो, असं जयंत पाटील म्हणाल्यानं भगीरथ भालके यांचा मार्ग आणखीनच सोपा झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान, आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे. अभिजीत बिचुकले यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“चित्रपटात दाखवतात ते पोलीस आणि प्रत्यक्षातले पोलीस यांच्यात जमिन आस्मानाचा फरक असतो”

बॉबी देओलला कित्येक वर्षांपूर्वीच माहित होता ‘कोरोना’, ऐश्वर्याची केली होती स्वॅब टेस्ट! पाहा गमतीदार व्हिडीओ

‘संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

‘मी मोठा भाऊ आहे, हात उचलला म्हणजे…’; त्या व्हायरल व्हिडीओवर बाबुल सुप्रियोंचं स्पष्टीकरण

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या फायनलवर कोरोनाचं सावट; गोलंदाजांना फटका बसण्याची शक्यता

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More