बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

80 वर्षांच्या आजी-आजोबांनी केलं असं काही वाचून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल

पाटणा | आयुष्याची संध्याकाळ केव्हा होईल हे माहित नाही. जे आपले नाहीच, त्याबद्दल कसला गर्व बाळगायचा त्यामुळे कुठेतरी आपणही समाजाचं देणं लागतो असं म्हणत बिहारमधील आजी-आजोबांनी कोरोनाग्रस्तांसाठी दोन लाख रूपये मदत केली आहे.

आजी-आजोबांनी पीएम केयर फंडमध्ये जवळपास एक लाख रूपये मदतीसाठी दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री मदत निधीतही त्यांनी एक लाख रूपये दिले आहेत. अशाप्रकारे दोन लाखांची मदत त्यांनी केली आहे.

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील हिराजी खेड्यातील भगीरथ मिश्रा पत्नी पुष्पा मिश्रासह राहतात. त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून त्यांचा घरखर्च भागतो. ऐंशी वर्षांचे भगीरथ मिश्रा प्रयागराजमध्ये अधीक्षकपदी कार्यालयातून निवृत्त झाले आहेत. त्यांना मुलं नाहीत.

एका लहानग्या मुलाने कोरोनाच्या युद्धासाठी त्याची पिगी बँकेत जमा झालेली रक्कम पीएम केअर फंडला दिल्याची बातमी त्यांनी वाचली. 438 रुपये या चिमुकल्याने दिले होते. ही बातमी वाचून त्यांनीही पीएम केअर्समध्ये मदत जमा करण्याचा निर्धार केला. भागीरथ आजोबांनी भविष्याचा विचार न करता आपल्या आयुष्यभराची जमापुंजीच दान केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘दारुची दुकानं सुरु केली मग मंदिरही खुली करा’; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

मद्य खरेदीसाठी आता इ-टोकन; असं करा रजिस्ट्रेशन

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

आज राज्यात 1230 नवे कोरोनाबाधित; पाहा तुमच्या जिल्ह्यात किती रूग्ण….

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More